आवाज महाराष्ट्राचा LIVE
प्रतिनिधी – प्रवीण धेंडे
सांगली : सांगली येथे माजी महापौर सुरेश पाटील यांनी काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ते गेल्या वर्षभरापासून राजकारणापासून समाजकारणापासून लांबच होते. ते जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सांगली जिल्ह्यात त्यांची ओळख होती. ते सद्या अजित पवार गटात प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी आहेत. गेल्या 30 ते 40 वर्षापासून ते राजकारणात सक्रिय सहभागी आहेत. अशातच सुरेश पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने आता सांगलीत खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
साधा कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असा प्रवास सुरेश पाटील यांचा राहिला आहे. त्यांच्या आत्महत्याच्या प्रयत्नामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगलीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. या घटनेची नोंद सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







