आवाज महाराष्ट्राचा LIVE
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे
मिरज : मिरज शहरांमध्ये दि.१४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
मिरज शहरामध्ये राष्ट्रसेवा दल सांगली,जिल्हा जय हिंद लोकचळवळ सांगली,जिल्हा बहुजन समन्वय समिती,न्यू इंग्लिश स्कूल मिरज,माजी विद्यार्थी संघटना सांगली,जिल्ह्या ॲपे रिक्षा वाहतूक संघटना,श्री रेणुका कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ मिरज,जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगली मिरज रोडवरील महात्मा फुले उद्यान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
मिरजेचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.विनोद परमशेट्टी सर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले,
सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांनी भारतीय संविधानाचे प्रस्तावनाचे वाचन केले त्यांच्या पाठोपाठ सर्व उपस्थितांनी संविधान प्रस्तावना वाचन केले.
यावेळी दिग्दर्शक बाळ बरगाळे,अकुंश कोळेकर,राजेश पाटील,दिपक सातपुते,राहत सतारमेकर,कोमल मगदूम,हेरंब माळी,शिवाजी दुर्गाडे,सागर माळी,सलीम सय्यद,अशोक भाऊ पाटील,बाळासाहेब पाटील, धनंजय भिसे,मिलिंद कांबळे, रामलिंग तोडकर, युवराज मगदूम, राष्ट्र सेवा दल जिल्हा अध्यक्ष दिनकर आदाटे,रोहित शिंदे,प्रणव पाटील,डॉ.प्रा.सुधीर बनसोडे,अशोकराव पाटील (कोकळेकर), प्रमोद कोरे, किराड अंकल,सुभाष जाधव, मिलिंद अग्रवाल, डॉ.संजय व्हावळ, हयातभाई कादरी, प्रभात हेटकाळे, प्रकाश भंडारे, सोहेल चौधरी, अभिजीत शिंदे, सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे,नरेश सातपुते,शब्बीर बेंगलोरे,अभिजीत माने,प्रकाश पवार,फुले शाहू आंबेडकर समतावादी विचारसरणीचे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितानी मिरज आणि जिल्ह्याचं वातावरण पोषक आणि शांत राहण्यासाठी भविष्यात एकत्रित काम करण्याचे आवाहन आणि निश्चय केले संयोजन साथी सदाशिव भाऊ मगदूम, विशाल लिपाने पाटील, युवराज मगदूम, जहीर मुजावर यांनी केले.








