आवाज महाराष्ट्राचा LIVE
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे
पलूस (सांगली) : दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पलूस मध्ये शासन मान्यता प्राप्त बहुजन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मूकबधिर विद्यामंदिर निवासी शाळा पलूस या ठिकाणी मूक बधिर शाळेतील लहान मुलांना वही व पेन प्रकारचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले, हा कार्यक्रम दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे दक्ष नागरिक पोलीस मित्र सांगली जिल्हा महिला अध्यक्षा सौ.वर्षा उपाध्ये यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला,सौ.वर्षा उपाध्ये या सामाजिक कार्यामध्ये खूप अग्रेसर असतात व आहेत अशा विविध ठिकाणी बऱ्याच शाळेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप करण्यात आले आहे.
आज पलूस येथे असाच एक कौतुकास्पद उपक्रम दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेच्या वतीने मूकबधिर लहान मुलांना वही आणि पेन अशा शालेय साहित्यांशी वाटप करण्यात आले. या मूकबधिर शाळेतील सौ.रूपाली शिंदे मॅडम व बिराजदार सर यांनी दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे त्याचबरोबर शाळेमध्ये हजर असणाऱ्या टीमचे कौतुक केले.
या मूकबधिर शाळेमधील वही पेन तसेच शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळेस दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेच्या उपमहासंचालिका कमल बोलें मॅडम,
दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष रंणजीत फाळके,
सांगली जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा मोहिते,
सांगली जिल्हा सदस्या सोनाली पाटील,
सांगली जिल्हा सदस्या उषाताई उरूनकर,
सांगली जिल्हा महिला जनसंपर्क अधिकारी पल्लवी सुतार,
सांगली जिल्हा सदस्या आदिती मिरजकर,
सांगली जिल्हा महिला निरीक्षक सुनिता भगत,
सांगली जिल्हा महिला उपनिरीक्षक प्रतीक्षा मस्के,
योगेश मोहिते, पंडित सोळवंडे, ज्ञानेश्वर भंडारे, स्वप्निल जाधव, धनश्री शिंदे तसेच सर्व पोलीस मित्र पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








