सातारा प्रतिनिधी / नौशाद अमीन सैय्यद
पांगारी /सातारा : मा.मकरंद आबा पाटील सभागृहात आयोजित मोफत टेलरिंग शिक्षण कोर्सचे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे साहेब यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले
यावेळी या उद्घाटन शुभ प्रसंगी शशिकांत भिलारे बापू, कॉन्ट्रॅक्टर राम गोळे, ऍडव्होकेट संग्राम पवार, माजी सरपंच जानू पांगारे, जेष्ठ नागरिक रखमाजी पांगारे बाबा, योगेश पांगारे, महादेव भिलारे, वंदना भिलारे,
तसेच बचत गटातील महिला, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
राजुशेठ यांनी नविन बचत गटांची माहिती घेऊन त्यांना ताबडतोब अनुदान मिळवून देण्याचे त्याचबरोबर नविन गटांना अर्थसाह्य मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले
तसेच गावातील महिलांनी जास्तीत जास्त याचा लाभ घेऊन व्यवसायाकडे वळावे आणि आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन यावेळी करण्यात आहे
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पांगारे यांनी केले तर उपस्थित्यांचे आभार जानू पांगारे यांनी मानले.





