आवाज महाराष्ट्राचा.LIVE
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे
खानापूर (सांगली): खानापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मेघना हिंगमिरे यांची एकमताने आणि बिनविरोध निवड होऊन महिलांच्या नेतृत्वाला नवा उजाळा मिळाला आहे. त्यांच्या निवडीमुळे शहरात महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
मेघना हिंगमिरे या गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा संयमित, सकारात्मक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांना नगरपंचायतीत वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.या निवडीनंतर नगरपंचायतीच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या जल्लोषात मेघना हिंगमिरे यांचे स्वागत केले.
ही निवड मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. विक्रम बांदल यांनी जबाबदारी पार पाडली. खानापूर- आटपाडीचे मुख्याधिकारी वैभव हजारे हे देखील यावेळी उपस्थित होते.या निवडीच्या पार्श्वभूमीवर मेधा हिंगमिरे यांचा नगरपरिषद प्रांगणात भव्य सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष सुहास (नाना) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी दादा भगत, सोन्या बापू मंडळे, लालासो पाटील, हर्षवर्धन माने, रामराजे माने, शहाजी भगत, डॉ.उदयकुमार हजारे, रोहीत त्रिंबके, बलराज माने, नगराध्यक्षा जयश्री मंडळे, स्वप्नील मंडले, वैभव टिंगरे,रविकिरण हिंगमिर,नशीर पिरजादे त्याचबरोबर सर्व पत्रकार, नगरसेवक-नगरसेविका व इतर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेधा हिंगमिरे यांनी उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या या निवडीनंतर शहरात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या निवडीवर प्रतिक्रिया देताना हिंगमिरे म्हणाल्या, “खानापूर शहराच्या विकासासाठी मी पूर्ण ताकदीनं काम करणार आहे. महिलांना सक्षम करण्यावर आणि तरुणांसाठी संधी निर्माण करण्यावर भर देईन.”
त्यांच्या निवडीनंतर शहरात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात त्यांच्याकडून ठोस कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









