आवाज महाराष्ट्राचा. LIVE
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे
देवीखिंडी – खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावामध्ये आज्ञाशील महिला संस्था ही अनेक वर्षापासून महिलांसाठी काम करत आहे,त्याचबरोबर अनेक महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून विविध उपक्रम राबवत असते.
महिलांनी सक्षम बनलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे समाजामध्ये अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही संस्था सातत्याने काम करत आहे.
आज आज्ञाशील महिला संस्था देवीखिंडी यांच्या वर्धापन दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन, वृक्ष वाटप असे विविध उपक्रम घेण्यात आले आणि महत्त्वाचं म्हणजे या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शितलताई शिंदे या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवत असतात,आज्ञाशील महिला संस्था यांच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.विशालजी शिंदे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी अधिकारी मा.श्री.प्रवीणजी राठोड उपस्थित होते
आज्ञशील महिला संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्षा निलप्रभा लोंढे, खजिनदार सुजाता वाले,
सदस्या वनिता गुरव,
सुनंदा शिंदे, सविता बोलें,
रमेजा शेख,सोनाली मस्के, सारिका निकम, त्याचबरोबर संस्थेचे सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.








